Grampanchayat Election : माझ्या डोळ्यादेखत... मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अजित पवार यांच्या आईनं काय बोलून दाखवली इच्छा?

Grampanchayat Election : माझ्या डोळ्यादेखत… मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अजित पवार यांच्या आईनं काय बोलून दाखवली इच्छा?

| Updated on: Nov 05, 2023 | 10:44 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावात म्हणजेच त्याचं गाव असलेल्या काटेवाडीत अजित पवार यांच्या आई आशाताई पवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज सकाळीत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित दादांच्या आई म्हणाल्या...

बारामती पुणे, ५ नोव्हेंबर २०२३ | राज्यात आज २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होत आहे. दरम्यान अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीत अजित पवार यांच्या आई आशाताई पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर आशाताई पवार यांना मतदान केल्यानतंर माध्यमांनी संवाद साधताना आपली मनातील इच्छा बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, ‘माझ्या डोळ्यासमोर अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे’ पुढे त्या असेही म्हणाल्या, बारामतीमध्ये लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. बारामती मधील जनता आमच्या सोबत आहेत. आता माझे वय ८६ झाले आहेत. मी १९५७ पासून मतदान करत आहेत. लोकांनाही वाटते अजित दादा मुख्यमंत्री व्हावे. माझ्या देखत दादाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, ही माझी सुद्धा इच्छा आहे, असेही त्यांनी म्हटले.

Published on: Nov 05, 2023 10:44 AM