Amol Mitkari : ‘चावलेला कुत्रा ‘वाघ्या’ तर…’, अमोल मिटकरींची संभाजी भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला. सोमवारी ही घटना घडली. रात्री 11 वाजता ते घराबाहेर पडले असता माळी गल्ली भागातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने गुरूजींच्या पायाला चावा घेतला.
संभाजी भिडे यांना सोमवारी सांगलीत एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. या घटनेनंतर भिडे गुरूजी यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र डागलं जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे गुरुजी यांचं नावं न घेता भिडेंवर निशाणा साधला आहे. त्यांना चावलेला कुत्रा हा वाघ्या तर नव्हता ना? असा खोचक सवाल मिटकरींनी केलाय. तर कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे, असं देखील मिटकरी यांनी म्हंटलं आहे. कुत्रा चावतो म्हणजे काय? मोघलाई लागली आहे का? असा सवालही मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात एक ट्वीट करत त्यांच्या रोख अप्रत्यक्षपणे भिडेंवर असल्याचे दिसतेय. ‘त्यांना चावलेला कुत्रा ‘वाघ्या’ तर नव्हता ना? जो कोणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्टट्रॅकवर चालला पाहिजे. चावतो म्हणजे काय? मोघलाई लागली आहे का?’ असा खोचक प्रश्न देखील मिटकरी यांनी ट्वीटमधून उपस्थित केल्याचे पाहायला मिळत आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री

हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा

वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक

रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?
