अजित दादांच्या नाराजीमुळे मिळालं पालकमंत्रीपद? विरोधकांचा हल्लाबोल

अजित दादांच्या नाराजीमुळे मिळालं पालकमंत्रीपद? विरोधकांचा हल्लाबोल

| Updated on: Oct 04, 2023 | 6:44 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून चंद्रकांतदादांची उचलबांगडी करण्यात आली तर अजितदादांकडे आता पुण्याचं पालकमंत्री पद असणार आहे. यावरून विरोधकांनी हल्लाबोल केलाय

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून चंद्रकांतदादा पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यानंतर आता अजित पवार यांना हे पद देण्यात आलं आहे. दरम्यान, चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपावण्यात आले असून त्या जिल्ह्यांची जबाबदारी आता त्यांच्याकडे असणार आहे. तर अजित पवार गटाच्या ७ मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र रायगड आणि सातारा या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील, सोलापूर- चंद्रकांत पाटील, अमरावती- चंद्रकांत दादा पाटील, भंडारा- विजयकुमार गावित, बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील, कोल्हापूर- हसन मुश्रीफ, गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम, बीड- धनंजय मुंडे, परभणी- संजय बनसोडे, नंदूरबार- अनिल भा. पाटील आणि वर्धा – सुधीर मुनगंटीवार असे १२ जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहे. दरम्यान, अजित दादांच्या नाराजीमुळे त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

Published on: Oct 04, 2023 06:44 PM