Vinayak Mete: निकटचा सहकारी गमावला, मेटे गेलेत यावर विश्वास बसत नाही- अजित पवार
शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधान पारिषदेचे माजी आमदार विनायकराव मेटे (Shivsangram Vinayak Mete Passed Away) यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी […]
शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधान पारिषदेचे माजी आमदार विनायकराव मेटे (Shivsangram Vinayak Mete Passed Away) यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनायकराव मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाज आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होत. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ सोबत असलेले ते माझे सहकारी होते. त्यांचं अकाली निधन हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे, अशा शोकभावना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केल्या.