Ajit Pawar ‘हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?’, ‘गद्दारीच्या ‘त्या’ व्हिडिओवर अजितदादा संतापले
Ajit Pawar Statement : जुने व्हिडिओ काढत बसण्यात अर्थ नाही, त्यावेळी ते विधान बरोबर होतं अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
भूतकाळात कोणता व्यक्ती कोणत्या पक्षात आहे. त्यावर ती ती वक्तव्य केली जात असतात. त्या त्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात असतात.आम्ही आज एकत्र आहे. राज्याला पुढे नेण्याचा आमचा मनापासून प्रयत्न आहे, तेव्हा मी विरोधात होतो. आता कशाला तो विषय काढतात? अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कुणाल कामरा प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतं आहे. यात ते शिंदेसेनेला गद्दार म्हणत असल्याचं दिसत आहे. त्यावरून आता नवीन चर्चा सुरू झालेली असताना आज पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: Mar 25, 2025 07:09 PM
Latest Videos

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला

'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी

संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी

पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
