महादेव जानकर मविआच्या दारातून पुन्हा महायुतीत, आता नेमकं कुठून लढणार? बारामती की परभणी?

महादेव जानकर मविआच्या दारातून पुन्हा महायुतीत, आता नेमकं कुठून लढणार? बारामती की परभणी?

| Updated on: Mar 26, 2024 | 11:07 AM

सुनेत्रा पवार यांच्याऐवजी महादेव जानकर बारामतीतून लढणार की परभणीतून? याची उत्सुकता आहे. चर्चा बारामती असली तरी जानकर परभणीतून लढणार अशी चर्चा आहे. कालपर्यंत भाजपने धोका दिल असं सांगणारे महादेव जानकर मविआच्या दारातून पुन्हा महायुतीत

रासपचे नेते महादेव जानकर यांची शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. यानंतर जानकर नेमके कुठून लढणार? याची चर्चा सुरू झाली. सुनेत्रा पवार यांच्याऐवजी महादेव जानकर बारामतीतून लढणार की परभणीतून उभे राहणार? याची उत्सुकता आहे. चर्चा बारामती असली तरी जानकर परभणीतून लढणार अशी चर्चा आहे. कालपर्यंत भाजपने धोका दिल असं सांगणारे महादेव जानकर मविआच्या दारातून पुन्हा महायुतीत आलेत. पण रासपच्या जानकरांना महायुतीत घेण्यामागे मोठी रणनिती असल्याचे बोलले जातंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव जानकर यांना बारामतीमधून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याऐवजी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महादेव जानकर लढू शकतात. मात्र असं असलं तरी महादेव जानकर मात्र परभणीतूनच लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 31 मार्चला जानकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच कळतंय. बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 26, 2024 11:07 AM