राजकीय नेत्यांच्या हट्टापायी पुणे मेट्रोला 12 वर्षे लागली; अजित पवारांचा आरोप

राजकीय नेत्यांच्या हट्टापायी पुणे मेट्रोला 12 वर्षे लागली; अजित पवारांचा आरोप

| Updated on: Mar 06, 2022 | 1:27 PM

एमआयटी महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थाने दाद दिली पाहिजे. पुणे मेट्रो सुरु करण्यासाठी जवळपास 12 वर्षे लागली. नितीन गडकरी साहेबांनी वेळोवेळी कठोर भूमिका घेतली आणि त्यामुळे कुठेतरी मेट्रोला सुरुवात झाली.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थाने दाद दिली पाहिजे. पुणे मेट्रो सुरु करण्यासाठी जवळपास 12 वर्षे लागली. नितीन गडकरी साहेबांनी वेळोवेळी कठोर भूमिका घेतली आणि त्यामुळे कुठेतरी मेट्रोला सुरुवात झाली. एक गोष्ट मान्य करावी लागेल की, पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मेट्रो आणि अन्य विकासकामावेळी खूप त्रास सहन करावा लागला. अजूनही काही काळ हा त्रास सहन करावा लागणार आहे. ही विकासकामं अजून काही वर्षे सुरु राहणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

Published on: Mar 06, 2022 01:27 PM