अवघ्या १० मिनिटात शिवमुद्रेवर शिवराय रेखाटणारा कोण आहे ‘तो’ अवलिया कलाकार?
VIDEO | शिवजयंती निमित्त अक्षय मेस्त्री यांनी शिवमुद्रेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारले, बघा व्हिडीओ
सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती साजरी केली जात आहे. १९ फेब्रुवारी रोजी गेल्या महिन्यात मोठ्या उत्साहात शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली. काही शिवप्रेमी तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिवजंयती साजरी करतात. दरम्यान, सिंधुदुर्गातील देवगड गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी शिवजयंती निमित्त शिवमुद्रेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारले आहे. ऐक्रलिक रंगांचा वापर करून ५ ते १० मिनिटांच्या कालावधीत हे चित्र साकारले असून हे लहान आकाराचे चित्र साकारायला अक्षय मेस्त्री यांनी भिंगाचा वापर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या शिवमुद्रेचा उपयोग करत असत. त्याच शिवमुद्रेवर शिवजयंती निमित्त महाराजांचे चित्र साकारले आहे. बघा अवलिया कलाकाराची भन्नाट कलाकृती…