Pune Rain Update | हवामान खात्याकडून पुणेकरांना सतर्कतेचा इशारा-TV9
पुणेकरांना सतर्क करताना पुण्यात मध्यम प्रतिचा पाऊस होणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचदरम्यान आता हवामान खात्याकडून पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणेकरांना सतर्क करताना पुण्यात मध्यम प्रतिचा पाऊस होणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच पुण्यात मागिल 2 ते 3 तासात 2.5 सेमी पेक्षा अधितक पाऊस झाल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुणेकरांनी सतर्क राहत वाहणे सावकाश चालवावीत, तर झाडे पडण्याचा धोका असून सुरक्षितता जपावी असेही आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
Published on: Sep 16, 2022 04:17 PM
Latest Videos