जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य, सरकारने केली घोषणा, जरांगे म्हणाले…
अंतरवाली सराटीतून सहा दिवसांपूर्वी मुंबईकडे निघालेल्या मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा मुंबईच्या वेशीवर नवीमुंबई येथे आली आहे. येथे मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात सभा घेणार आहेत. या राज्य सरकारच्या वतीने मंत्री दीपक केसरकर यांनी जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे म्हटले आहे.
नवी मुंबई | 26 जानेवारी 2024 : मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी ‘चलो मुंबई’ चा नारा देणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर धडकले आहे. नवीमुंबईतील एपीएमसी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधव जमले आहेत. या मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मनोज जरांगे आता मराठा आरक्षणावर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्ठमंडळाशी चर्चा केली आहे. या चर्चेतून नेमका काय तोडगा निघाला याची माहीती मनोज जरांगे थोड्याच वेळात देणार आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी 37 लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आहोत. ही संख्या आता 50 लाखाच्या पार जाणार आहे. हे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याचे यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Published on: Jan 26, 2024 12:55 PM
Latest Videos