लोकसभा निवडणुकीसाठी अंबादास दानवे इच्छुक? म्हणाले, “निवडणुकीत माझं नाव उभं राहणं…”
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. त्यासाठी उमेदवारांची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा होत आहे. याच पार्श्वसभूमीवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. त्यासाठी उमेदवारांची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेतील बंडानंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून कोण मैदानात उतरणार याची देखील चर्चा सुरू आहे. त्यातच आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा होत आहे. याच पार्श्वभीवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी लोकसभेला उभं राहणार की नाही हे माझ्यावर नाही तर उद्धव ठाकरे यांच्यावर अवलंबून आहे.माझ्या नावची चर्चा सुरू असेल, पण चर्चेत नसणारा उमेदवार यादीत असू शकतो”, असं अंबादास दानवे म्हणाले.

