Maharashtra Politics : पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर? शिवसेना नेता म्हणाला…
पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. तसेच मी भाजपची असली तरिही थोडीच भाजप माझा आहे असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर ते आता पर्यंत त्या नाराज असल्याचेच बोलले जात आहे. याचदरम्यान त्यांना बीआरएस पक्षाने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून भाजप महायुतीत वाद होत आहेत. भाजपवर मित्र पक्ष नाराज दिसत आहेत. त्यांची समजूत काढली जात असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. तसेच मी भाजपची असली तरिही थोडीच भाजप माझा आहे असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर ते आता पर्यंत त्या नाराज असल्याचेच बोलले जात आहे. याचदरम्यान त्यांना बीआरएस पक्षाने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. ज्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावरून ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, पंकजा ताई या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत. त्यांच्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. त्यांनी आता पर्यंत राज्याचं नेतृत्व केलं आहे. त्यांना नेतृत्वासाठी पदाची काही आवश्यकता नाही असं ते बोललेत. Maharashtra Politics