Sunil Tatkare : अमित शाह स्नेहभोजनासाठी सुनील तटकरेंच्या घरी, ‘त्या’ 45 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय-काय घडलं?
अमित शहा यांनी तटकरेंच्या घरी 45 मिनिटे भेट दिली. ही भेट घरच्या घरी स्नेहभोजनाच्या स्वरूपात होती. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. तटकरेंनी स्पष्ट केले की, या भेटीमध्ये प्रामुख्याने कौटुंबिक चर्चा झाली.
छत्रपती शिवरायांची ३४५ वी पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या नूतनीकरणाच्या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त अमित शाह यांनी रायगड किल्ल्यावर हजेरी लावली. यानंतर अमित शाह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजणासाठी देखील गेले. यावेळी अमित शहांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, प्रवीण दरेकर, शिवेंद्रराजे भोसले, मुरलीधर मोहोळ, धैर्यशील पाटील, प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील आदी नेते देखील हजर होते. अमित शाह सुनील तटकरेंच्या घरी जवळपास 45 मिनिटे होते, अशी माहिती समोर येत आहे. सुनील तटकरेंच्या निवासस्थानी जाताना अमित शाहांसोबत, देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सर्वजण एकाच गाडीने रायगडमधील रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे पोहोचले. दरम्यान, अमित शाह यांच्यासोबत कौटुंबिक चर्चा झाली. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे तटकरेंनी अमित शाहांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर सांगितले. बघा काय म्हणाले तटकरे?

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?

'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा

पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा

'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
