Video : अमित शाह यांची कोल्हापुरात सभा, स्थानिकांना नोटिस, काय कारण? पाहा...

Video : अमित शाह यांची कोल्हापुरात सभा, स्थानिकांना नोटिस, काय कारण? पाहा…

| Updated on: Feb 19, 2023 | 3:45 PM

केंद्रीय मंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. नागाळा पार्क इथं आज त्यांची सभा होणार आहे. स्थानिकांना पोलिसांकडून नोटिस देण्यात आली आहे. पाहा...

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातील नागाळा पार्क इथं आज त्यांची सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्यात आली आहे. कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरातल्या अपार्टमेंट धारकांना पोलिसांकडून नोटिस देण्यात आली आहे. आज दुपारी विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत. शाहूपुरी पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. सभा आणि अमित शहा यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही नोटीस बजावण्यात आली आहे. आजच्या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Published on: Feb 19, 2023 03:42 PM