अमित शाहांचा रायगड दौरा अन् तटकरेंच्या घरी स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? तटकरे की गोगावले कोणाची वर्णी?
किल्ले रायगडावर शिवरायांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडतोय. यासाठी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह आज रायगड दौऱ्यावर असून ते रायगडावर दाखल झाले आहेत.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह आज रायगड दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्रिपदाची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वादामुळे रायगडचं पालकमंत्रिपद स्थगित करण्यात आलं होतं. अशातच अमित शाह आज रायगड दौऱ्यावर असल्याने पालकमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार भरत गोगावे हे पालकमंत्री व्हावं, असं शिवसेनेतील आमदार, नेत्यांचं म्हणणं आहे तर राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे अमित शाह रायगड दौऱ्यावर असताना आज सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्या, अमित शाहांच्या या दौऱ्यात पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
