Amol Kolhe यांनी घेतली अजित पवार यांची भेट, अमोल कोल्हे यांनीच सांगितलं भेटीमागचं कारण
राष्ट्रवादी हा पक्ष कुणाचा याचा फैसला निवडणूक आयोगात होत असताना शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३ : राष्ट्रवादी हा पक्ष कुणाचा याचा फैसला निवडणूक आयोगात होत असताना शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आल्याचे पाहायला मिळाले. यावर पूर्णविराम देताना अमोल कोल्हे यांनी म्हटले की, मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी अजित पवार यांच्याशी भेट घेतली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत दोन प्रोजेक्ट आहेत. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे आणि इंद्रायनी मेडिसिटी प्रकल्पासाठी ही भेट होती, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी राजकीय वर्तुळातील चर्चांवर पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या एकाच पक्षाचे दोन पक्ष झाले आहेत. यानंतर अजित पवार यांचा मिळणाऱ्या प्रतिसादावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, मतमतांतर चर्चेत नव्हते, विकास कामाच्यावेळी अजित पवार मतमतांतर आणत नाही तर तशा प्रकराचे कोणतेही बंधनं अजित पवार घालत नाही. देशातील महत्त्वाचा इंद्रायनी मेडिसिटी प्रकल्प जो आहे तो शिरूर मतदार संघात होत असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा

'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी

मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले

पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
