अमोल मिटकरी किरीट सोमय्यांवर बरसले, म्हणाले तोतरी जबान…
“कोल्हापुरच्या मातीशी जो नडतो, त्याला तेथील माती गाडते. यावेळी तुम्ही चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला आहे. तुमची तोतली जबान आहे, त्याला झणझणीत चपराक करवीरवासी लावणार."
बुलढाणाः amol mitkari : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने बुधवारी छापेमारी केली. त्यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर छापेमारी केली. यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफांचं काऊंटडाऊन सुरु झाल्याचं सांगितलं. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “कोल्हापुरच्या मातीशी जो नडतो, त्याला तेथील माती गाडते. यावेळी तुम्ही चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला आहे. तुमची तोतली जबान आहे, त्याला झणझणीत चपराक करवीरवासी लावणार.”
Published on: Jan 12, 2023 12:30 PM