अमरावतीची सीटी बस सेवा मागील तब्बल 25 दिवसापासून बंद, प्रवाशांचे हाल
Amravati City Bus : 1 मार्चपासून अमरावती शहरातील सिटी बस बंद आहे. मरावती मनपा अंतर्गत चालवली जाणारी अमरावती सिटी बसची सेवा मागील तब्बल 25 दिवसापासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचेही प्रचंड हाल होत आहेत. पाहा व्हीडिओ...
अमरावती : अमरावती मनपा अंतर्गत चालवली जाणारी अमरावती सिटी बसची सेवा मागील तब्बल 25 दिवसापासून बंद आहे. सिटी बस बंद असल्याने सर्वसामान्य अमरावतीकर प्रवाशांच्या खिशाला कात्री लागतेय. मनपाने दुसरा कंत्राटदार नेमला पण अद्यापही करार प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सिटी बसची चाके थांबलेली आहेत. अमरावती शहरातून दररोज 3 हजार प्रवासी विद्यार्थी करतात सिटी बसने प्रवास करतात. पण आता सिटी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. सर्वसामान्य प्रवाशांचेही प्रचंड हाल होत आहेत. 1 मार्चपासून अमरावती शहरातील सिटी बस बंद आहे. ही सिटी बस लवकर सुरू व्हावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
Published on: Mar 25, 2023 01:02 PM
Latest Videos