साधा कार्यकर्ताही पाडू शकतो, लोकांमधून किती निवडणुका निवडून आलात? नवनीत राणांचा राऊतांना थेट सवाल
VIDEO | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं केलं कौतुक, काय म्हणाले बघा
अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीच्या निमित्तानं हनुमान चालीसाचं पठण केलं. यावेळी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे किस खेत की मुली हैं, असा उल्लेख नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावरही टीका केली. आगामी निवडणुकीत नवनीत राणा यांना दाखवून देऊ की किस खेत की मुली. यावर खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युतर दिलं आहे. ‘संजय राऊत हे माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे आहेत. संजय दादा आपण किती निवडणुका निवडून आले? संजय राऊत यांना साधा कार्यकर्तासुद्धा निवडणुकीत हरवू शकतो. एखाद्या साधा कार्यकर्ता जो मातीशी जुळून आहे, तोसुद्धा संजय राऊत यांना निवडणुकीत पराभूत करू शकतो. नेत्याला जुळण्यापेक्षा मातीशी जुळणारा व्यक्ती संजय राऊत यांना निवडणुकीत नक्कीच हरवू शकतो.’, असे नवनीत राणा म्हणाले आहेत.