खासदार नवनीत राणा आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं

| Updated on: Feb 12, 2022 | 5:55 PM

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरुन अमरावतीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याच्या कारणावरुन महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (Pravin Ashtikar) यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार बुधवारी घडला. या प्रकरणात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशावेळी अटकेतील आरोपींना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप खासदार नवनीत राणा […]

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरुन अमरावतीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याच्या कारणावरुन महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (Pravin Ashtikar) यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार बुधवारी घडला. या प्रकरणात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशावेळी अटकेतील आरोपींना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलाय. या प्रकरणातील काही आरोपींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आरोपींना भेटण्यासाठी नवनीत राणा (Navneet Rana) रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांची महिला पोलीस अधिकाऱ्याशी चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं.

अब्दालीच्या 15 लाखांची फोजेसोबत 1 लाख मराठ्यांनी लढा दिला आणि इतिहास घडला- ज्योतिरादित्य सिंधिया
IPL 2022 Auction | IPL लिलावात Ishan Kishanला सर्वाधिक बोली