Video : महाराष्ट्रापासून जम्मू काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के! लोकांमध्ये घबराट, भूकंपाचे केंद्र अफगणिस्तानातील काबूल

Video : महाराष्ट्रापासून जम्मू काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के! लोकांमध्ये घबराट, भूकंपाचे केंद्र अफगणिस्तानातील काबूल

| Updated on: Aug 26, 2022 | 8:36 AM

Earthquake News : या भूकंपाचा केंद्रबिंदू हा अफगणिस्तानात असल्याची माहिती समोर आली आहे. अफगणिस्तानातील काबूलमध्ये भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आलीय.

मुंबई : महाराष्ट्रापासून जम्मू काश्मीरपर्यंत (Jammu Kashmir) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर सेक्ल इतकी होती. या भूकंपाने काही ठिकाणी भिंतींना तडेही गेलेत. त्यामुळे परिसरात घबराट उडालीय. जम्मू काश्मिरात गेल्या तीन दिवसांत 7 वेळा भूकंपाचे धक्के जाणवलेत. महत्त्वाचं म्हणजे या भूकंपाचा केंद्रबिंदू हा अफगणिस्तानात (Afghanistan) असल्याची माहिती समोर आली आहे. अफगणिस्तानातील काबूलमध्ये भूकंप (Earth quake News) झाला. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आलीय. अद्यापतरी भूकंपात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. मात्र या भूकंपनाचे लोकांची घाबरगुंडी उडालीय. पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले असल्याची नोंद करण्यात आलीय.

Published on: Aug 26, 2022 08:17 AM