Nagpur election : नागपूर मनपा निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच काँग्रेससोबत आघाडी, दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण

Nagpur election : नागपूर मनपा निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच काँग्रेससोबत आघाडी, दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण

| Updated on: Jun 17, 2022 | 3:58 PM

नागपूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी सुरू आहे. पण, सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही, तर राष्ट्रवादी स्वबळावर मनपा निवडणुका लढण्यास सज्ज असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलंय.

नागपूर : मनपा निवडणुकीत (Municipal Corporation) सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच काँग्रेससोबत आघाडी करू, असं मत गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी व्यक्त केलंय. नागपूर मनपातील सर्व वॅार्डात निवडणूक तयारी करण्याच्या सूचना पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. पदाधिकाऱ्यांवर प्रभागांची जबाबदारी सोपविली. नागपूर मनपात काँग्रेसने आधीच स्वबळाचा नारा दिला होता. आता राष्ट्रवादीची स्वबळाच्या दिशेनं तयारी करत आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले, राष्ट्रवादीकडे अनेक संस्था आहेत. त्या माध्यमातून लोकांची कामे करण्यावर भर दिला पाहिजे. नागरिकांची मदत करावी. राष्ट्रवादीतील छपास नेत्यांचीही कानउघाडणी केली. कामावर लक्ष द्यावे, असं कार्यकर्त्यांना उद्देशून ते बोलत होते. राष्ट्रवादीनं आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली. गेली पंधरा वर्षे नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी आता राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी सुरू आहे. पण, सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही, तर राष्ट्रवादी स्वबळावर मनपा निवडणुका (Election) लढण्यास सज्ज असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

Published on: Apr 20, 2022 10:52 AM