रत्नागिरीत समुद्र खवळला, शाळांना सुट्टी; मंडणगडमध्ये पावसाचा रेकार्ड ब्रेक; पुढील तीन दिवस आँरेंज अलर्ट
दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देताना पुढील २४ तासांत राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातील काही भागांसाठी ऑरेंज, रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी | 22 जुलै 2023 : संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, मुंबई-उपनगर, रायगड-कोकणसह अनेक भागात संततधार पाऊस सुरू आहे. दुसरीकडे महाड, खेड, चिपळूण आदी भाग पावसाच्या पाण्याने वेढले आहेत. तर रेल्वे आणि रस्ते वाहतूकही पावसामुळे विस्कळीत झाली होती. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देताना पुढील २४ तासांत राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातील काही भागांसाठी ऑरेंज, रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, महाबळेश्वर, पुणे, लोणावळा आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडेल. या 5 भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर रत्नागिरीसाठी पुढील तीन ते चार दिवस दक्षतेचे आहेत. येथे जिल्ह्याला २५ जुलैपर्यंत आँरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. तर कमी वेळेत मुसळधार सरीवर पाऊस, मंडणगड तालुक्यात गतवर्षीचा पावसाचा रेकार्ड ब्रेक केला आहे. दरम्यान समुद्र देखील खवळलेला असून 50 किलोमीटर वेगाने वाहतात वारे वाहताना दिसत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. अनुचित प्रकार होवू नये म्हणुन आज देखिल शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.