अनिकेतशास्त्री म्हणतात ‘त्या’ दर्ग्यामध्ये देवी देवता, पुरातत्व विभागाकडे केली अशी मागणी
ज्ञानवापी प्रमाणे त्र्यंबकेश्वरमधील दर्ग्याचेही सर्वेक्षण करावे, अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी पुरातत्व विभागाकडे केली आहे. दर्ग्यामध्ये देवी-देवतांचे चिन्ह कोरलेले आहेत, दर्ग्याच्या जागेवर नाथ संप्रदायाचं मंदिर असल्याचा दावा महंत अनिकेतशास्त्री यांनी केला आहे.
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेश करून धूप, आरती आणि फुले वाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये वादाला तोंड फुटले आहे.आता या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान ज्ञानवापी प्रमाणे त्र्यंबकेश्वरमधील दर्ग्याचेही सर्वेक्षण करावे, अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी पुरातत्व विभागाकडे केली आहे. दर्ग्यामध्ये देवी-देवतांचे चिन्ह कोरलेले आहेत, दर्ग्याच्या जागेवर नाथ संप्रदायाचं मंदिर असल्याचा दावा महंत अनिकेतशास्त्री यांनी केला आहे. एसआयाटी चौकशीबरोबरच या दर्ग्याचीही चौकशी करावी, असं अनिकेतशास्त्री म्हणाले.
Published on: May 19, 2023 12:54 PM
Latest Videos