“गद्दारीचे आधीपुरुष शरद पवार, आज त्यांचा वाढदिवस…”, भाजप खासदाराची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडाला 20 जून रोजी एक वर्ष झाला. याच निमित्ताने ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात गद्दार दिन आणि खोके दिवस साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडाला 20 जून रोजी एक वर्ष झाला. याच निमित्ताने ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात गद्दार दिन आणि खोके दिवस साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.”महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष पुर्ण होत आहे, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपलं कुटुंब आपली जबाबदारी म्हणून आपल्या कुटुंबापुरतेच मर्यादित राहत होते. याला तिलांजली देऊन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेच्या घरात जाऊन मदत करत आहेत. मला आश्चर्य वाटत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस गद्दार दीन साजरा करत आहे. मात्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष गद्दारीचे आधीपुरुष आहेत. खऱ्या अर्थाने फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात शरद पवार यांनीच केली. गद्दार दिन साजरा करण्यापेक्षा शरद पवारांचा वाढदिवस साजरा करावा,” असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलय.