नवनीत राणा कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? या पक्षाच्या नेत्यांकडून थेट ऑफर

नवनीत राणा कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? या पक्षाच्या नेत्यांकडून थेट ऑफर

| Updated on: May 30, 2023 | 3:43 PM

एकीकडे आमदार बच्चू कडू अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आपला उमेदवार उभा करण्याचं बोलत आहेत, तर त्यातच आता अमरावती जिल्ह्यातील जनेतेला कमळ पाहिजे, असं वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे.

अमरावती: एकीकडे आमदार बच्चू कडू अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आपला उमेदवार उभा करण्याचं बोलत आहेत, तर त्यातच आता अमरावती जिल्ह्यातील जनेतेला कमळ पाहिजे, असं वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कमळ चिन्हावरील उमेदवार पाहिजे, ही जनभावना आहे. भारतीय जनता पक्षाचा कमळावरील उमेदवार निश्चित असावा ही मागणी भाजपच्या वतीने करणार आहोत. खासदार नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढल्या तर अधिक चांगला आशीर्वाद मिळेल, असे अनिल बोंडे म्हणाले.

Published on: May 30, 2023 03:40 PM