“शरद पवारांना सोडून गेलेल्या ‘या’ 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री!”

जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतशी शरद पवार गटाची ताकद आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील घोषणा केली

शरद पवारांना सोडून गेलेल्या 'या' 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री!
| Updated on: Oct 04, 2024 | 5:54 PM

हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यांतर आता शरद पवार गटात आता अजित पवार गटाचा आणखी एक बडा नेता प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी आपला मुलगा रणजितसिंह शिंदे तुतारी किंवा अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची मोठी घोषणा केली असतानाच माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलंय. शरद पवार यांना सोडून गेलेल्या ९ जणांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही. त्या ९ मंत्र्यांना पुन्हा राष्ट्रवादीत घ्यायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे, असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. नागपुरात बोलत असताना ते असं म्हणाले की, ‘आमचा राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवारांचा पक्ष आहे. त्यांनी ठरवून टाकलं आहे, आमच्या पक्षातून साहेबांना जे सोडून गेले ते सात आठ नऊ लोकं जे सध्या मंत्री आहेत. त्यांना कोणालाच पक्षात पुन्हा घ्यायचं नाही, असं आमच्या पक्षात ठरलं आहे’, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

Follow us
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.