Video : साई रिसॉर्ट प्रकरणी अडचणी वाढणार? अनिल परब यांना पोलीस समन्स बजावणार

Video : साई रिसॉर्ट प्रकरणी अडचणी वाढणार? अनिल परब यांना पोलीस समन्स बजावणार

| Updated on: Nov 10, 2022 | 9:48 AM

दापोली पोलिसांकडून शिवसेना नेते अनिल परब यांना समन्स बजावण्याच्या हालचाली सुरु

दापोली : शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांना दापोली पोलीस (Dapoli Police) समन्स बजावणार असल्याची माहिती समोर आली आहे. साई रिसॉर्ट (Sai Resort) प्रकरणात अनिल परब यांच्यासह 3 जणांना समन्स बजावला जाणार आहे. अनधिकृत रिसॉर्ट परबांचं असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, आता न्यायालयाच्या आदेशानंतर समन्स बजावण्याच्या दापोली पोलिसांच्या हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या वतीने रिसॉटप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आता पोलिसांकडून समन्स बजावलं जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्या अडचणी वाढणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Nov 10, 2022 09:48 AM