नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारने केली मोठी घोषणा, अनिल पाटील म्हणाले…
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतीचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला.शेतकरी हवालदिल झालाय. अशात सरकारकडून आता आजपासून पंचनामे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई, 26 जुलै 2023 | राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतीचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला.शेतकरी हवालदिल झालाय. अशात सरकारकडून आता आजपासून पंचनामे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “आपापल्या विभागात ताबडतोब पंचनामे करण्याचे निर्देश राज्यातील सगळे आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 5 हजाराची मदत तुटपुंजी होती ती 10 हजार करण्याच येईल, उद्याच्या कॅबिनेटमध्ये त्याबाबत निर्णय होईल. उद्यापर्यंत ९५ टक्के पंचनामे पूर्ण झालेले असतील.”
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

