अंजली दमानिया आणि धनंजय देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
आतापर्यंत आम्ही कधी भेटलो नव्हतो, फक्त फोनवर बोलणं झालं होतं. म्हणून मी आज ठरवून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, सगळ्या चांगल्या माणसांना भेटायला कधीच काही प्रॉब्लेम नसतो, असेही दमानिया यांनी या भेटीनंतर म्हटलंय.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जालन्या जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जात अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली. ‘गेल्या दोन महिन्यात जालन्यातील शेतकरी दोनदा मुंबईत भेटायला आले होते. त्यावेळी जालन्यात येऊन तेथील सत्य परिस्थिती पाहते आणि तिथे तुमच्याकडून ऐकून घेते, असं त्यांना आश्वासन दिलं होतं. कारण मुंबईत सर्वच शेतकऱ्य़ांना पोहोचता येणं शक्य नाही. त्यामुळे जालन्यात यायचं होतं’, असं अंजली दमानिया म्हणाल्या. यासह मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करावी असं वाटत होतं, म्हणून जालन्यात आल्याचे अंजली दमानिया म्हणाले.

दहशतवाद्यांचं काउंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?

VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू

पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
