Anjali Damania : देशमुखांना अडकवण्यासाठी काय होता प्लान? ‘त्या’ महिलेची हत्या? अंजली दमानियांच्या खळबळजनक दाव्यानं बीड हादरलं

Anjali Damania : देशमुखांना अडकवण्यासाठी काय होता प्लान? ‘त्या’ महिलेची हत्या? अंजली दमानियांच्या खळबळजनक दाव्यानं बीड हादरलं

| Updated on: Mar 31, 2025 | 4:06 PM

'दोन दिवसांपूर्वी मला अशी माहिती मिळाली की कळंबला राहणाऱ्या मनीषा बिडवे नावाच्या एक बाई आहेत, या असेच सर्व प्रयोग करायच्या आणि अनेक लोकांवर खोटे आरोप करायचे.' दमानियांचा खळबळजनक आरोप नेमका काय?

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आलीये. पाच ते सहा दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरात पडून होता. शेजरच्या घरातील माणसांना या मृतदेहाचा वास आल्यानंतर महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. शेजारच्यांनी या घडलेल्या घटनेची पोलिसांत तक्रार दिली. यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. मनिषा कारभारी बिडवे, असं या मृत महिलेचं नाव असून मृत महिला बीड जिल्ह्यात आडस गावची रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. तर सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी तयार केलेली हीच ती महिला असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मनिषा बिडवे, मनिषा गोंदवले, मनिषा आकूसकर, मनिषा बियानी अशा वेगवेगळ्या नावांनी ही महिला वावरायची. यासह आडस, रत्नागिरी, अंबाजोगाई, कळंबमध्ये या महिलेचा वावर होता, अशी देखील माहिती समोर येतं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भात एक दावा केला आहे. दमानिया म्हणाल्या, ‘संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी वाल्मिक कराड हे सर्व करणार होते. त्या बाईंना तयारही ठेवण्यात आले होते. संतोष देशमुखांना मारहाण झाल्यानंतर त्यांचा प्राण गेला आणि मग रस्त्यात फेकून ती मंडळी गायब झाली होती. खरंतर संतोष देशमुखांना त्या बाईकडे नेऊन त्यांना एका गुन्ह्यात अडकवण्याचा त्यांचा प्लान होता, असा दावा दमानियांनी केला.

Published on: Mar 31, 2025 04:03 PM