छगन भुजबळ यांना भाजपची ऑफर? अंजली दमानिया यांच्या ‘त्या’ दाव्यावर काय म्हणाले भुजबळ?

| Updated on: Feb 02, 2024 | 5:32 PM

भाजप छगन भुजबळ यांना मोठा ओबीसी नेता बनवणार असल्याचेही वक्तव्यही अंजली दमानिया यांनी केलं होतं. दरम्यान, एका व्यक्तीकडून ही माहिती मिळाल्याचे अंजली दमानिया यांनी टिव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटलंय. अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत केलेल्या दाव्यावर स्वतः छगन भुजबळ यांनी भाष्य केले

मुंबई, २ फेब्रुवारी २०२४ : मंत्री छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे तर भाजप छगन भुजबळ यांना मोठा ओबीसी नेता बनवणार असल्याचेही वक्तव्यही अंजली दमानिया यांनी केलं होतं. दरम्यान, एका व्यक्तीकडून ही माहिती मिळाल्याचे अंजली दमानिया यांनी टिव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटलंय. अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत केलेल्या दाव्यावर स्वतः छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. मला भाजपकडून कोणतीही ऑफर आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासह माझ्या पक्षात घुसमट नसल्याचे स्पष्टीकरणही छगन भुजबळ यांनी दिलंय. ‘दमानियांना कशी काय माहिती मिळाली? हे मला माहीत नाही. मला कुठल्या पदाचा हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी समाजासाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे, असं काही नाही. असं काही प्रपोजल मला आलेलं नाही.’, असं स्पष्टपणे भुजबळ म्हणाले.

Published on: Feb 02, 2024 05:32 PM
संजय शिरसाट म्हणाले बाळासाहेबांची चप्पलही लाखमोलाची तर राजन साळवी म्हणाले खूर्चीची किंमत करणं म्हणजे…
ते सुपारी घेऊन… मनोज जरांगे पाटील यांचं राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर