Anjali Damania : ‘बुद्धीला हे न पटण्यासारखं…’, धसांच्या ‘त्या’ गंभीर आरोपांवर दमानियांची पहिली प्रतिक्रिया
‘मला मारण्याचा कट रचण्यात आला होता. यासह बिश्नोई गँगला देखील बोलवण्यात आलं होतं’, सुरेश धस यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर काय म्हणाल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया?
खोक्या भोसले प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला असल्याचं वक्तव्य बीडच्या आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलं. सुरेश धस यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सुरेश धस यांनी केलेल्या या खळबळजनक आरोपांवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. खोक्या भोसले प्रकरण असो किंवा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना भेटणं असो यामध्ये सुरेश धस यांचं नाव खूप गुरफटलं गेलंय. त्यामुळे याप्रकरणात सुरेश धस यांना आता संपूर्ण जनतेची सहानुभूती मिळवायची आहे, असं वक्तव्य करत अंजली दमानिया यांनी सुरेश धसांनी केलेल्या गंभीर आरोपांवरून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुढे त्या असंही म्हणाल्या, साधारण व्यक्तीच्या बुद्धीला हे न पटण्यासारखं आहे. हरणाचं मांस खायला घालून बिश्नोई गँगला बोलवून त्यांच्या हत्येचा कट होता, असा आरोप करणं म्हणजे हे मुर्खपणा आहे. सुरेश धस आता वाटेल ते बोलायला लागले आहेत. त्यामुळे सुरेश धस यांना कोणीही गंभीररित्या घेऊ नये, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली.

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली

गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना

भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
