वाघाच्या छावाचं नामकरण पार, Kishori Pednekar यांनी सांगितलं नाव – tv9
मादी बछड्याचे नामकरण करण्यात आले असून तिचे नाव “वीरा” असे ठेवण्यात आले आहे. तर हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील मोल्ट (नर) व फ्लिपर (मादी )यांच्या जोडीने 18 ऑगस्ट 2021 रोजी जन्म दिलेल्या पेग्विन नर पिल्लाचे नामकरण करण्यात आले असून त्याचे नाव “आँस्कर ” असे ठेवण्यात आले आहे.
मुंबई : राणीच्या बागेतील बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) व करिष्मा (मादी) यांनी 14 नोव्हेंबर 2021 रोजी जन्म दिलेल्या मादी बछड्याचे नामकरण करण्यात आले असून तिचे नाव “वीरा” असे ठेवण्यात आले आहे. तर हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील मोल्ट (नर) व फ्लिपर (मादी )यांच्या जोडीने 18 ऑगस्ट 2021 रोजी जन्म दिलेल्या पेग्विन नर पिल्लाचे नामकरण करण्यात आले असून त्याचे नाव “आँस्कर ” असे ठेवण्यात आले आहे. या नामकरणाची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील थ्रीडी ऑडिटोरियम येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते केक कापून नामकरण झाल्याचे जाहीर करण्यात आले. महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाल्या की, सुमारे 15 वर्षानंतर12 फेब्रुवारीला औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन प्राणीसंग्रहालयातून बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर ) व करिष्मा ( मादी) मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयामध्ये आणण्यात आली.