‘उद्धव ठाकरेंची माफी, माझी चूक…’, नॉट रिचेबल होण्यापूर्वी श्रीनिवास वनगांची tv9 ला प्रतिक्रिया
उमेदवारी न दिल्याने शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना धक्का बसला.“घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला”, अशी प्रतिक्रिया श्रीनिवास वनगा यांनी दिली आहे. तसेच “ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते”, असंदेखील श्रीनिवास वनगा म्हणाले आहेत.
पालघरमध्ये राजेंद्र गावित यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिल्याने शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना धक्का बसला. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची माफी मागतो, माझी चूक झाली… असे म्हणत नॉट रिचेबल होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी tv9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला असं श्रीनिवास वनगा यांनी म्हटलं आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यासारखा प्रामाणिक एकनिष्ठ व्यक्ती, दिलेला शब्द पाळतात. मी त्या प्रामाणिक आणि एकनिष्ठ व्यक्तीची माफी मागतो.’ पुढे ते असेही म्हणाले. “मी देवमाणसाला सोडून आलो. उद्धव ठाकरे माझ्यासाठी देवमाणूस होतो. त्यांच्यामुळे मी पालघर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झालो. पण घातकी माणसासोबत गेलो आणी माझा घात झाला. त्यावेळेस बंड करताना मला शब्द दिला होता की, कोणत्याही आमदाराचं तिकीट कापणार नाही आणि आमची आज ही अवस्था आहे”