तौक्तेनंतर आता गुजरातला ‘या’ चक्रीवादळाचा धोका, सौराष्ट्र-कच्छला अलर्ट जारी

तौक्तेनंतर आता गुजरातला ‘या’ चक्रीवादळाचा धोका, सौराष्ट्र-कच्छला अलर्ट जारी

| Updated on: Jun 11, 2023 | 11:59 AM

तौक्ते नंतर आता या चक्रीवादळाकडे अधिक शक्तिशाली वादळ म्हणून पाहिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने किनारपट्टीच्या भागातील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथील राज्यांना हा इशारा देण्यात आला होता.

मुंबई : अरबी समुद्रामध्ये घोंघावणार्‍या बिपरजॉय चक्रीवादळाने (Biparjoy Cyclone) अजून रौद्र रूप धारण केले आहे. तौक्ते नंतर आता या चक्रीवादळाकडे अधिक शक्तिशाली वादळ म्हणून पाहिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने किनारपट्टीच्या भागातील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथील राज्यांना हा इशारा देण्यात आला होता. पण आता राज्यातील किनारपट्टीच्या भागातील तर प्रामुख्याने मुंबईवरिल संकंट टळले आहे. आयएमडीने दिलेल्या अंदाजानुसार, ‘बिपरजॉय चक्रीवादळाने आपला मार्ग बदलला असून ते आता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 510 किमी अंतरावर आहे. येत्या काही तासांत हे वादळ तीव्र होऊन 15 जून पर्यंत हे वादळ पाकिस्तान तसेच सौराष्ट्र आणि कच्छच्या किनार्‍याला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळं गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दक्षिण अरबी समुद्राच्या नजिकच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. तर महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टी वर यामुळे मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

Published on: Jun 11, 2023 11:59 AM