मर्दाची औलाद, गद्दार, माज अन् फुसका बार, 'त्या' शाखेवरून पुन्हा राडा; ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली

मर्दाची औलाद, गद्दार, माज अन् फुसका बार, ‘त्या’ शाखेवरून पुन्हा राडा; ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली

| Updated on: Nov 13, 2023 | 10:32 AM

दिवाळीत राजकीय लवंगी फटाके आणि सुतळी बॉम्ब मोठ्या प्रमाणात फुटताय. मुंब्र्यातील शाखा तोडल्यानंतर सुरू झालेला वाद हा विकोपाला पोहोचलाय. शाखा तोडल्यावरून उद्धव ठाकरे यांना शाखेची पाहणी करण्यापासून रोखल्यावरून आता ठाकरे यांचे शिलेदारांनी शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय

मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३ | मुंब्र्यातील शाखा तोडल्यानंतर आता ऐन दिवाळीत ठाकरे आणि शिंदे गटात चांगलंच राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीत राजकीय लवंगी फटाके आणि सुतळी बॉम्ब मोठ्या प्रमाणात फुटताय. मुंब्र्यातील शाखा तोडल्यानंतर सुरू झालेला वाद हा विकोपाला पोहोचलाय. एकमेकांना बघण्याची, मस्ती जिरवण्याची भाषा सुरू झाली. शाखा तोडल्यावरून उद्धव ठाकरे यांना शाखेची पाहणी करण्यापासून रोखल्यावरून आता ठाकरे यांचे शिलेदारांनी शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे आणि फडणवीसांवर केलेल्या टीकेवर भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावादावर जास्त बोलणं टाळलंय. बघा भाजप नेत्यांनी काय केला पलटवार?

Published on: Nov 13, 2023 10:32 AM