बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने त्याची दिवंगत आई मोना शौरी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, त्याला दररोज त्याच्या आईची आठवण येते. आईची उणीव आजही जाणवत असल्याचे तो म्हणतो.
आपल्या आईचा फोटो शेअर करत अर्जुनने लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. मला माझ्या फोनवर तुझे नाव दिसले नाही. मला तुझी आठवण येते आई... मला तु हाक मारल्याचे आठवते, मला तुझा गंध आठवतो, तुझ्यासमोर अपरिपक्व असणे आणि तुझे मला हाताळणे, मला तुझ्याबरोबर हसणे आठवते... मला तुझी आठवण येते मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे...अशा पध्दतीने अर्जुन कपूरने भावनिक पोस्ट लिहिली आहे.
अर्जुनची बहीण अंशुलानेही तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक नोट शेअर केली आहे. तिने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. 'मला माझी आई हवी आहे' या भावनेला खरंच वयाची मर्यादा नसते आणि दु:खालाही कालमर्यादा नसते. 10 वर्षे झाली तू जाऊन...
तसेच भाऊ अर्जुनचे कौतुक करताना अंशुला म्हणाली: "आई, मला आशा आहे की तू कुठेही असशील तिथून तू आम्हाला पाहत आहेस आणि तुला अर्जुन आणि माझा अभिमान वाटला पाहिजे. दही, कढी, भात तुझ्याशिवाय चव येत नाही आई. तुझ्यावर प्रेम आहे. आई माझ्या हृदयाचा सर्वात मौल्यवान तुकडा आहेस गं तू.
मोनी कपूर या बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी आहेत. अर्जुन आणि अंशु ही दोन मुलं मोनी कपूर या बोनी कपूर यांनी आहेत. 1996 ला बोनी कपूरने यांनी श्रीदेवी लग्न केल्यानंतर मोनी कपूर यांना मोठा धक्का बसला. त्या धक्कातून कश्याबश्या सावरल्या. संघर्ष करीत आयुष्य जगल्या, 2012 मध्ये त्यांना कॅन्सर झाला आणि त्यांचं निधन झालं.