Terror Attack Update : भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF जवानांकडून युद्धाभ्यास, पाहा tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. अशातच पाकिस्तानविरोधात भारताकडून कठोर पाऊलं उचलली जात आहे. अशातच आता हल्ल्यानंतर सीमेला लागून असलेल्या भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेला लागून असलेल्या काही भागांना अलर्ट जारी करण्यात आला होता. सीमेलगतच्या सर्व भागात सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. गावापासून शहरापर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला असताना अशातच राजस्थानमध्ये लष्कराचा युद्ध सराव पाहायला मिळत आहे. एलओसी असो किंवा वाळवंटातील रणरणत्या उन्हात भारतीय लष्कर सर्वत्र सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे. भारत पाकिस्तानच्या सीमेवर सैन्याची मोठी गस्त पाहायला मिळत आहे. जैसलमेर येथील सीमा रेषेवर भारतीय बीएसएफचे जवान पूर्णपणे तैनात करण्यात आले आहेत. एलओसीवर वाढलेल्या तणावामुळे बीएसएफचे जवान हाय अलर्ट मोडवर आहेत. अशातच अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर जैसलमेर येथील सीमा रेषेवर दुपारचे तापमान ४५ अंशांच्यावर असलेल्या या कडक उन्हात बीएसएफच्या जवानांकडून गस्त घातली जात असल्याचे दिसतेय.

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन

भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....

मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल

भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
