७ वर्षाच्या अर्णवीचा ‘या’ नृत्यात रेकॉर्ड, बघा का झाली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद?

| Updated on: Jun 05, 2023 | 4:24 PM

VIDEO | सात वर्षांच्या चिमुकलीनं भरतनाट्यममध्ये रचला विक्रम

वर्धा : नुकतंच लातुरच्या सृष्टी जगताप या १७ वर्षीय मुलीने सलग १२६ तास नृत्य सादर करून नवा विश्वविक्रम केला आहे. या विश्व विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. लातुरच्या दयानंद सभागृहात सृष्टी जगताप ही सलग 126 तास म्हणजे गेली पाच दिवस पाच रात्री सलग नृत्य करीत होती. यानंतर आता वर्ध्यातील अर्णवी सागर राचर्लावार या सात वर्षांच्या चिमुकलीनं विक्रम नोंदवला आहे. अर्णवीने सलग तीन तास ३९ मिनीट भरतनाट्यम नृत्य केलं तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने एक तासाचे उद्दिष्ट दिले होते. ते उद्दिष्ट पूर्ण करत अर्णवीने सलग तीन तास ३९ मिनिट भरतनाट्य नृत्य करत नवीन रेकॉर्ड नोंदवला. अर्णविने दररोज एक तास सराव केला. तिच्या यशाबद्दल कौतूक होत आहे. अर्णविला सात वर्षांत १३७ पुरस्कार मिळाल्याचेही सांगितले जात आहे.

Published on: Jun 05, 2023 04:24 PM
“बारामतीच्या नेत्यांनी देशाला ब्लॅकमेल करण्याचं काम केलं”, कोणी केली पवार कुटुंबावर टीका?
नवनीत राणा यांचा विरोधकांना टोला, स्वप्न पाहायला पैसे….