“गद्दारांवर आनंद दिघे यांची भूमिका शिंदेंची शिवसेना विसरली का?”, ठाकरे गटाचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धर्मवीर आनंद दिघे यांनी जामिनासाठी पवारांनी मदत केली, असं म्हटलं आहे.यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. तसेच मविआकडून वारंवार आनंद दिघे यांचा अपमान केला जात आहे. ठाकरे गटाला हे मान्य आहे का असा प्रश्न शिंदे गटाकडून विचारण्यात आला. यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धर्मवीर आनंद दिघे यांनी जामिनासाठी पवारांनी मदत केली, असं म्हटलं आहे. पवारांनी ठरवलं असतं तर आनंद दिघे टाडाच्या बाहेर आले नसते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. तसेच मविआकडून वारंवार आनंद दिघे यांचा अपमान केला जात आहे. ठाकरे गटाला हे मान्य आहे का असा प्रश्न शिंदे गटाकडून विचारण्यात आला. यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुळात आनंद दिघे यांचा अपमान मिंधे गटाकडून केला जातोय. गद्दारी केल्यानंतर आनंद दिघे यांची भूमिका काय होती याचा विसर पडलाय का ? त्यांनीच त्यावर विचार करावा”, असं म्हटलं आहे. यावेळी अरविंद सावंत यांनी आनंद दिघे यांचा जुना किस्सा सांगितला.
Published on: Jun 07, 2023 09:50 AM
Latest Videos