Cruise Rave Party | आर्यन खानला अटक केलेल्या रेव्ह पार्टीचा एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ
आर्यन खान अडकलेल्या क्रुझवरील रेव्ह पार्टीचा एक्स्क्लुझिव्ह tv9 च्या व्हिडीओ हाती लागला आहे. अथांग समुद्रात जहाजावर ही पार्टी तीन दिवस रंगणार होती.
शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. त्यामुळे या रेव्ह पार्टीची एकच चर्चा सुरु झाली असून या रेव्ह पार्टीतील एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ हाती लागला आहे. अथांग समुद्रात जहाजावर ही पार्टी तीन दिवस रंगणार होती. मात्र, त्याआधीच एनसीबीने हा बेत उधळून लावला आहे.
एनसीबीच्या सूत्रांनुसार, जर आर्यनला या कार्यक्रमात अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले असेल, तर त्याला यासाठी काही आमंत्रण किंवा काही प्रकारचा प्रस्ताव असायला हवा होता. परंतु त्याच्याकडे असे कोणतेही आमंत्रण किंवा प्रस्ताव नाही. तो फक्त असे म्हणत आहे की त्याला आमंत्रित केले गेले होते, मग ते कोणी केले, तो योग्य प्रकारे सांगू शकला नाही आणि अरबाजला प्रत्येक गोष्टीची माहिती होती असे म्हणत तो टाळत आहे.