वारी सोहळा इतिहासात घडलं नेमक काय? तुकोबारायांच्या पादुकांचा नीरा स्नानाला टँकरचा आधार?
पण यावेळी हे स्नान नदीत करता न आल्यानं वारकरी नाराज झाले आहेत. कारण नीरा नदी ही गेली तीन ते चार वर्षांपासून वाहलीच नाही. पाऊस न झाल्याने नारी कोरडीच पडली आहे. तर आताही जून ओलांडण्याच्या मार्गावर असतानाही पाऊसाने दडी मारली आहे.
अकलूज (सोलापूर) : लाखो वारकऱ्यांसाठी वारी जितकी महत्वाची असते. तितकतं त्यांच्यासाठी नदीतील स्नानही महत्वाचं असतं. पण हे स्नान त्यांच नव्हे तर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं असते. पण यावेळी हे स्नान नदीत करता न आल्यानं वारकरी नाराज झाले आहेत. कारण नीरा नदी ही गेली तीन ते चार वर्षांपासून वाहलीच नाही. पाऊस न झाल्याने नारी कोरडीच पडली आहे. तर आताही जून ओलांडण्याच्या मार्गावर असतानाही पाऊसाने दडी मारली आहे. सराटी गावाजवळ तुकोबांच्या पादूकांना नीरा स्नान घातल्याची परंपरा आहे. मात्र स्नान देण्यासाठीही नीरात पाणी नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे तुकोबांच्या पादुकांना यावेळी टँकरनं स्नान घालण्यात आलं आहे. तर यामुळं वारकऱ्यांच्या नीरा स्नानाच्या आनंदावर यंदा विरजण पडलं आहे. मात्र पाऊस येऊ दे असं वारकऱ्यांनी विठुरायाकडे साकडं घातलं आहे. असं पहिल्यांदाच घडलं आहे.