‘मोदी आणि ठाकरे यांची विचारधारा एकच, आम्ही फक्त ओबीसीसाठी’; ओवैसी यांची टीका

‘मोदी आणि ठाकरे यांची विचारधारा एकच, आम्ही फक्त ओबीसीसाठी’; ओवैसी यांची टीका

| Updated on: Aug 07, 2023 | 2:56 PM

या अधिवेशनाचे उद्घाटन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेतेही हजेरी लावणार आहेत. ओबीसींचे प्रश्न आणि मागण्या या अधिवेशनात मांडल्या जाणार आहेत.

तिरुपती, 7 ऑगस्ट 2023 | येथे आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाधिवेशन होत आहे. येथे ओबीसांच्या मागण्यांवर ठराव करुन केंद्र आणि राज्य सरकारला पाठवलं जाणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेतेही हजेरी लावणार आहेत. ओबीसींचे प्रश्न आणि मागण्या या अधिवेशनात मांडल्या जाणार आहेत. याचदरम्यान या अधिवेशनाला MIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. त्यांनी आम्हाला त्यांच्या मध्ये खेचू नका. तर ठाकरे आणि भाजपची विचारधारा एकच आहे. मग आम्हाला यात कशाला खेचता असा सवाल केलाय. त्याचबरोबर आम्ही कोणाची टीम नसून आम्ही, अल्पसंख्यांक, दलित आणि ओबीसीची टीम आहोत असे म्हटलं आहे.

Published on: Aug 07, 2023 02:56 PM