Shahid Afridi : पाकिस्तानचा क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर…
भारतानेच हल्ला केला असं म्हणत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला असल्याचे पाहायला मिळाले. पहलगाममध्ये अतिरेक्यांनी एक तास हल्ला केला. पण भारतीय लष्कर काहीच करू शकलं नाही असं आफ्रिदीने म्हटले आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला आहे. पहलगाम हल्ला भारताने घडवून आणला आहे, असं आफ्रिदी म्हणाला आहे. स्वतःच हल्ला करून भारताने पाकिस्तानकडे बोट दाखवलं आहे, असं संतापजनक वक्तव्य आफ्रिदीने केलं आहे. एक तास दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पण काश्मीरमध्ये असलेलं आठ लाखांचं भारतीय लष्कर काहीही करू शकलं नाही, असंही आफ्रिदी बरळला आहे. आफ्रिदीच्या या वक्तव्यावर एमआयएमचे प्रमुख असद्दुद्दीन ओवैसींनी संताप व्यक्त केला. शाहिद आफ्रिदी जोकर असल्याचे त्यांनी म्हटलंय. तर आफ्रिदीच्या या वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया हा चांगलाच भडकला आहे. शाहिद आफ्रिदी अतिरेकी विचारांशी जोडला गेला आहे, असं कनेरिया म्हणाला आहे. भारतीय टेलिव्हिजनवर त्याला स्थान देऊ नका असाही सल्ला कनेरियाने दिला आहे.
तर दुसरीकडे, भारताने पाकिस्तानसोबत यापुढे क्रिकेट खेळू नये असं भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला आहे. अतिरेक्यांनी दिलेल्या जखमा या क्रिकेटमुळे भरून शकत नाहीत, असं ट्वीट अझरुद्दीनने केलं आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचे युट्यूब चॅनल भारतात बंद केले आहे. तर पाकिस्तानचे इतरही 16 युट्यूब चॅनेल्स भारतात बॅन करण्यात आले आहेत.

लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?

दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?

भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा

बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
