आषाढी एकादशीनिमित्त ‘लालपरी’ सज्ज, एसटी महामंडळाकडून विशेष तयारी
VIDEO | आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाकडून काय विशेष तयारी?
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील वारकऱ्यांना दिलासादायक बातमी आहे. कारण आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाकडून विशेष तयारी करण्यात येत आहे. राज्यातील एसटी आगारांमधून पंढरपूरसाठी पाच हजार बसेस सोडल्या जाणार आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या ९ एसटी डेपोमधून २५० बस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. तर भाविक भक्त प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ सज्ज आहे. गेले दोन वर्ष कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बस उपलब्ध करून दिल्या होत्या. दोन ते तीन वर्षांनंतर यंदा वारी सोहळा होणार आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यापार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.