जवळीक वैगेरे काही नाही, शेतावर भेटलो होतो इतकच; पवार भेटीवर देशमुखांचे स्पष्टीकर
हिंगणा मतदारसंघात आपलं शेत असून तेथे चांगला ऊस आहे. तोच बघायला आपल्या शेतावर शरद पवार आणि अजीत पवार आले होते
नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी होणार असं बोललं जात आहे. तर त्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीक वाढल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असही बोललं जात आहे. याचदरम्यान देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंगणा मतदारसंघात आपलं शेत असून तेथे चांगला ऊस आहे. तोच बघायला आपल्या शेतावर शरद पवार आणि अजीत पवार आले होते. आमच्यात जवळीक वैगेरे काही नाही, असं त्यांनी राष्ट्रवादीच्या जवळिकीवर आपले मत व्यक्त केलं आहे. तर आमदारकीला एक वर्ष बाकी असताना आपण काग्रेसमध्ये आल्याचे सांगत जे काग्रेस पक्षाचं हिताचं आहे. तेच आफण बोलल्याचे ते म्हणाले. तर शिस्तपालन समितीने तीन तास बैठक घेतली तरिही आपल्या विरोधात एकही कारण मिळालेलं नाही. नोटीस ही मिळालेली नाही. नोटीस आलीच तर आपण योग्य उत्तर देऊ असेही ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट

असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
