सामनाचा अग्रलेख म्हणजे गांजा-चिलीम ओढणाऱ्याने लिहिलेला अग्रलेख; भाजपच्या नेत्याचं टीकास्त्र
Saamana Editorial : राहुल गांधींविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत असेल तर मुख्यमंत्र्यांसारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला चोर म्हणणाऱ्यांवर ही कारवाई झाली पाहिजे, असं म्हणत भाजप नेत्याने टीकास्त्र डागलं आहे. पाहा...
कोल्हापूर : सामनाचा अग्रलेख म्हणजे गांजा आणि चिलीम ओढणाऱ्याने लिहिलेला अग्रलेख याच्यापेक्षा जास्त त्याचा उल्लेख करता येणार नाही, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी सामना अग्रलेख अन् पर्यायाने संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आपण काय करतोय, याचं काँग्रेसच्या नेत्यांना भान आहे का? समाजाच्या भावना दुखवायच्या. समाज न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर आरोपीच्या बाजूने काँग्रेस आंदोलन करते. हे योग्य नाही. राहुल गांधींनी माफी मागितलीच पाहिजे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
Published on: Mar 25, 2023 02:05 PM
Latest Videos