‘लोकशाहीचं दमन करणाऱ्या सरकारला पायऊतार करा’, काँग्रेसची आक्रमक मागणी

| Updated on: Mar 23, 2023 | 5:12 PM

VIDEO | कायद्याचा दुरुपयोग वारंवार होतोय त्यामुळे लोकशाहीचं दमन करणाऱ्या सरकारला पायऊतार करा, काँग्रेसची आक्रमक मागणी

मुंबई : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज राहुल गांधी यांच्या विरोधात सत्ताधारी आक्रमक होत त्यांनी जोडे मारो आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. यावर काँग्रसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाष्य केले. काँग्रेसला कोणत्याही विषयावर बोलता येऊ नये, स्पष्टपणे भूमिका घेता येऊ नये म्हणून हे सर्व देशात, राज्यात सुरू आहे. सुरत कोर्टाने ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी समंज पाठवलं आणि शिक्षाही सुनावली हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसच्या वतीने या संपूर्ण प्रकरणाचा तीव्र निषेध करतो आणि एमआरसीला आम्ही आंदोलन घेत आहोत त्या ठिकाणी आम्ही आमची भूमिका मांडू त्यासोबतच देशभरामध्ये या घटनेचा तीव्र निषेध आता नोंदवला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 23, 2023 05:12 PM
चिमुकल्याचा अनोखा रेकॉर्ड, वाढदिवसाच्या दिवशी ५१ किलोमीटर केले सायकलिंग
बिरोबा महाराज यात्रेतील पारंपारिक दशावतारी खेळ, बघा व्हिडीओ