५० वर्षांच्या सवयीनं अशोक चव्हाण गोंधळले, भाजपात प्रवेश केल्यानंतर मुंबई अध्यक्षांचं नावच चुकवलं अन्...

५० वर्षांच्या सवयीनं अशोक चव्हाण गोंधळले, भाजपात प्रवेश केल्यानंतर मुंबई अध्यक्षांचं नावच चुकवलं अन्…

| Updated on: Feb 13, 2024 | 2:41 PM

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नवीन सुरुवात करत आहे. भाजपची जी काही ध्येयधोरणं आहेत, त्यानुसार काम करेल. पक्ष जो आदेश देईल, फडणवीस जे सांगतील ते काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले मात्र सुरूवातीलाच ते गोंधळले.

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नवीन सुरुवात करत आहे. भाजपची जी काही ध्येयधोरणं आहेत, त्यानुसार काम करेल. पक्ष जो आदेश देईल, फडणवीस जे सांगतील ते काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले मात्र सुरूवातीलाच ते गोंधळले. भाजपात प्रवेश केल्यानंतर मुंबई अध्यक्षांचं नाव घेताना अशोक चव्हाण चुकले आणि त्यांनी थेट काँग्रेसचं नाव घेतलं. मुंबई काँग्रेसचे… भाजपचे भाजपचे.. (अशोक चव्हाण) सवयीचा भाग आहे. ५० वर्षाची सवय असल्यामुळे नाव चुकलं असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले की, पहिली पत्रकार परिषद माझी भाजपच्या कार्यालयात होत आहे. तेवढं मला एक्सक्युज करा. पहिली पीसी आहे. कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विचओव्हर थोडासा… सर्वात आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा , फडणवीस, बावनकुळे, शेलार यांचे आभार मानतो. आम्ही विरोधात असतानाही राजकारणाच्या पलिकडेही आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. आयुष्याची खरी सुरुवात करत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले.

Published on: Feb 13, 2024 02:41 PM